शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचाच आवाज घुमणार आहे. शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दसरा मेळावा घेण्यास अखेर ठाकरे गटाला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. शिंदे गटानेही परवानगीसाठी पत्र दिले होते, परंतु त्यांनी ते पत्र मागे घेतले. त्यामुळं ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. २४ ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.