एसटीच्या ई शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी हा निर्णय घेतला आहे. एसटीच्या संचालक बैठकीत प्रस्तावना मान्यता देण्यात आली आहे. प्रवाशांना मदत आणि सेवा देण्यासाठी एसटीचा हा मोठा निर्णय आहे. पुणे महामार्गाच्या धावणाऱ्या ई शिवनेरी बसमध्ये सेवा देणारी परिचारिका ठेवण्यात येणार आहे.
यावर जितेंद्र आव्हाड प्रतिक्रिया देत म्हणाले की, शिवनेरी सुंदरी कशी फिरणार त्या एसटी मधून ती काय खायला देणार? काय प्यायला देणार? नेमल्या आहेत त्या पण त्या काय करणार आहेत ते सांगा. असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.