शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची पहिल्या सत्रातील सुनावणी संपलेली आहे. तर दुसऱ्या सत्रातील सुनावणी दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे. 10 जानेवारीपर्यंत अपात्रतेवर निकाल देण्याचं नार्वेकरांपुढे आव्हान असेल. सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे. सोमवारपासून सुनावणीला सुरु झाल्ली आहे. तर उद्यापासून निकाल लेखनाचे काम सुरु होणार आहे. 54 आमदारांच्या 34 याचिकांवर 6 गटांत निकाल लावला जाणार आहे. त्यामुळे निकालाकडे लक्ष राहणार आहे. पुढील 21 दिवसांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर निकाल लेखनाचे आव्हान असेल.