शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी महत्त्वाची बातमी आहे. सुनावणीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल झालेला आहे. अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीने वेळापत्रकात बदल झालेला आहे. आजपासून 15 डिसेंबरपर्यंत लेखी युक्तिवाद होणार आहे. दोन्ही गटांकडून उलट साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सोमवारी अंतिम सुनावणीला सुरुवात होईल. उद्यापासून पुढील तीन दिवसात लेखी उत्तर सादर करावे लागणार आहे.