राज्यात 2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाले. युतीचे सरकार सत्तेवर येत असतांनाची अपेक्षा असतांना मुख्यमंत्रीपदावरुन युती तुटली आणि नंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आली. खरंतर भाजप-शिवसेना संघर्षाची ही सुरुवात होती. परंतु संघर्षाची ठिणगी ही नव्हती. या काळात सासू-सुनेसारखी थोडीफार नोक-झोक होत होती. परंतु संघर्षाची ठिणगी पडली नोव्हेंबर 2021 मध्ये...दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांच्यावरुन...आज तरी त्या उद्धव ठाकरेंसोबत आहे...पण शिंदे सेनेत जाण्याची शक्यताही नाकारली जात नाही.
दादरा आणि नगर हवेलीचे भाजपचे खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईत आत्महत्या केली. डेलकर यांनी आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही वरिष्ठ भाजप नेत्यांची नावे होती. मग राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाखाली असलेले सरकार अॅक्टीव्ह झाले. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. एसआयटीकडे तपास दिला गेला. अर्थात हे सर्व भाजपच्या अडचणी वाढवण्याची खेळी होती.
अशी पडली भाजप-सेनेत पहिली ठिणगी
फेब्रुवारी 2021 पासून भाजपचे केंद्रीय नेते आणि शिवसेनेचे स्थानिक नेते यांच्यांत संघर्ष सुरु झाला. मग नोव्हेंबर 2021 मध्ये दादर नगर हवेली लोकसभा मतदार संघाची निवडणूक झाली. भाजपने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी तिकीट न देता महेश गावित यांना तिकीट दिले. शिवसेनेने ही संधी साधत कलाबेन यांना आपल्याकडे ओढले. त्यांना शिवसेनेचे तिकीट देत निवडून आणले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कलाबेनच्या पराभवासाठी राण पेटवले होते. परंतु शिवसेनेच्या चिन्हावर त्या निवडून आणल्या.