मुंबईतील चेंबूरमध्ये ठाकरे गट-शिवसेना आमनेसामने आले होते. दोन्ही गटातील शेकडो कार्यकर्ते समोरासमोर आले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. शाखेचा ताबा घेण्यावरून दोन्ही गटात वाद झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.