2014 आणि 2019 भाजप शिवसेनाची युती का तुटली यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. 2019 ला जेव्हा मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली तेव्हा उद्धवजींनी एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केलं. एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे केल्यानं भाजपने युती तोडली, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.