जेलमधील 101 दिवसांच्या अनुभवांवर सामनाच्या दिवाळी अंकात संजय राऊत यांनी लेख लिहला आहे. या लेखात त्यांनी त्यांचे बरेच अनुभव मांडले आहेत. आर्थर रोड जेलमध्ये नीरव मोदीसाठी फाईव्ह स्टार सुविधा निर्माण केल्याचं संजय राऊता यांनी लिहलं आहे.
कसाबच्या सेलच्या शेजारी नीरव मोदीसाठी सेल तयार करण्यात आला होता. या सेलमध्ये टीव्ही, बाथरुम तयार करण्यात आलं होतं. त्या सेलची रोज साफसफाई केली जात होती. शिवाय रोज चित्रिकरणही केलं जात होतं. नीरवसाठी सेल तयार केला पण नीरव जेलमध्ये आलाच नाही असं राऊतांनी म्हटलं आहे.