निवासी डॉक्टरांच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. सरकारकडून वेतन वाढी संदर्भातला जीआर अखेर जारी करण्यात आला आहे. विद्या वेतनात 1 मार्च 2024 पासून अनुज्ञेय महागाई भत्त्यासह 10 हजारांची वाढ करण्यात आली आहे. वेतनासाठी वाढ होण्यासाठी डॉक्टर अखेर संपावर होते त्यांच्या संपाला यश आले आहे. तर वेतन वाढीच्या मागणीसह इतर वेगवेगळ्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलेलं होतं त्यामुळे रुग्णांचे हाल होत होते. त्यामुळे आता सरकारकडून वेतन वाढी संदर्भातला GR अखेर जारी करण्यात आला आहे.