सोलापूर लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु केली आहे. एकीकडे काँग्रेस उमेदरवार प्रणिती शिंदे यांनी 10 वर्षात भाजप खासदार काहीही करू शकले नाहीत. पाण्याची पाईपलाईन आणू शकले नाहीत. ना रोजगार आणू शकले, ना साधी विमानसेवा सुरु करू शकले नाहीत अशी टीका प्रणिती शिंदे यांनी भाजपावर केली आहे. याला भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी उत्तर दिलं आहे.
राम सातपुते म्हणाले की, ऑगस्ट महिन्यात सोलापुरातून विमानतळ सुरु होईल. त्यासाठी मी मोदीजींजवळ जाऊन बसेन पण विमानतळ सुरु करेन हा माझा शब्द आहे. पुढील पाच वर्षात सोलापूरला 25 वर्षे पुढे नेईल हा शब्द देतो. विमानतळ सुरू झाल्यानंतर सोलापूरकरांसाठी उत्तम प्रकारचं आयटी पार्क उभा करणार, असं राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांच्या टिकेला उत्तर दिलं आहे.