विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील घाटकोपर येथे प्रचार सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. तसचं सत्तेत नसतानाही त्यांनी केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली आहे.
उद्धव ठाकरेंचं सरकार असताना आम्ही मशिदीवरील भोंगे आम्ही बंद केले. यावेळी 17000 महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीतर आम्ही सांगितलं होतं, की त्यापुढे हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले. रेल्वे भरतीसाठी मनसेनं आंदोलन केलं, कारण इथल्या नोकऱ्या बाहेरच्या राज्यातील तरुणांना दिल्या जात होत्या.या परिक्षांची इंथ जाहिरात दिली जात नव्हती, याला जबाबदार कोण? असा सवालही राज ठाकरेंनी केला. तसच मनसेनं ज्या गोष्टी केल्यात त्या कायमस्वरूपी आहेत असेही राज ठाकरे म्हणाले.