राज्यात किंगमेकर कोण आणि किंग कोण ते विधानसभा निकालानंतर कळेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात मविआचं सरकार येईल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यावर नितेश राणेंनी प्रतिक्रीया दिलीय. राऊत आणि राऊतांच्या तारखा हा फार मोठा विनोद असून राऊतांची सकाळ फडणवीसांना बुके देताना असेल, असा हल्लाबोल नितेश राणेंनी केलाय.