तळोजा जेलमध्ये कैद्यांना चिकन, मटण असं VIP जेवण दिल जातं असल्याची माहिती समोर आली आहे. जेलमध्ये असलेले कैदी जे शिक्षा भोगत आहेत, मात्र त्यांची मेजवानी जेलमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. तळोजा जेलमध्ये VIP कैदांना नॉन व्हेज जेवण देत असल्याचा आरोप केला जात आहे. तर तळोजा जेल कैद्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आलेली आहे.
तळोजामधील कैदी सुरेंद्र गडलिंगच्या तक्रारीनं आता खळबळ माजलेली आहे. या कैद्यांकडून भरभक्कम पैसा घेतला जात आहे आणि त्यांना नॉन व्हेज जेवण पुरवलं जात आहे. याठिकाणी तुरुंग अधिकारी सुनील पाटील यांना पैशांची लाज देऊन त्यांच्याकडून कैद्यांना नॉन व्हेज जेवण पुरवलं जातं आहे असा थेट आरोप आरोपी सुरेंद्र गडलिंग यांनी पत्र लिहून केलेला आहे. त्यांनी हे पत्र सीबीआयचे प्रमुख यांना लिहलेले आहे.