मिलिंद देवरा यांचा शिंदेगटात प्रवेश होत आहे. ठाकरे गटाने दक्षिण मुंबई या जागेवर दावा केला होता. त्या ठाकरे गटाच्या दाव्याने मिलिंद देवरा हे नाराज आहेत अशा प्रकारची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती आणि त्याचे परिणाम आपण पाहतोय. मिलिंद देवरा यांच्या समवेत आता 10 पदाधिकारी पक्षप्रवेश करत आहेत. मिलिंद देवरा यांच्या समर्थकांची वर्षा निवासस्थानी मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेसला मोठा धक्का म्हणावा लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिलिंद देवरा यांचे पक्ष प्रवेश केले जात आहे.