Matheran Mini Train Team Lokshahi
व्हिडिओ

Matheran Mini Train : पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर 100 वर्षांहून जुनी 'माथेरानची राणी' आजपासून धावणार

दिवाळीत हिल स्टेशन माथेरानला फिरण्याचा बेत आखत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Published by : Team Lokshahi

दिवाळीत हिल स्टेशन माथेरानला फिरण्याचा बेत आखत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नेरळ-माथेरान टॉय ट्रेनबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. माथेरान मिनीट्रेनची सेवा आज ४ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे. नेरळ - माथेरान - नेरळ अशी ही मिनीट्रेनची सेवा असणार आहे. मध्य रेल्वेप्रशासनाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. अमन लॉज ते माथेरान अशी सेवा सुरु आहे. पावसाळ्यात नेरळ ते अमन लॉज ही सेवा बंद करण्यात आली. पण ही सेवा आता पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर आहे. येथे अनेक पर्यटक दिवाळीच्या सुट्ट्यात भेट देत असतात. मुंबईकरांच्या फिरण्यासाठी अत्यंत योग्य असे हे जवळचे डेस्टिनेशन असते. मात्र येथे जाण्यासाठी माथेरानच्या मिनी ट्रेनची सेवा पावसाळ्यात अर्धवट सुरु असते. पण आता नेरळ ते माथेरान अशी ही सेवा पुन्हा एकदा सुरळीत होणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे.

मिनी ट्रेनचं वेळापत्रक -

या वेळी दिवाळी चा सुट्टीचा हंगाम नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात सुरू होत असल्याने उशिराने ट्रेन सेवा सुरू होत आहे सोमवार ते शुक्रवार तीन फेऱ्या असतील तर शनिवारी व रविवारी दोन फेऱ्या आहेत

सोमवार ते शुक्रवार नेरळ हुन सकाळी 7, 8.50 व 10.25 यावेळात माथेरान साठी गाडी सुटेल ती स 10.40, 11.30 व दु 1.25 वा माथेरानला पोहोचेल व माथेरान हुन नेरळ साठी दु 12.25, 2.25 व 4 वा सुटेल त्या नेरळ येथे दु 4.30, 5.30 व सायंकाळी 6.40 पोहोचेल.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी