मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पाहायला मिळत आहे. मविआचे उमेदवार संजय दिना पाटलांचे पॅम्प्लेट्स वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. घाटकोपरमधील गुजराती बहुल सोसायटीत हा प्रकार घडलेला आहे तर 'मराठी माणसाला बिल्डिंगमध्ये प्रचार करायला देणार नाही' अशी भूमिका सोसायटीतील लोकांची आहे.
महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचे पॅम्प्लेट्स वाटण्यास परवानगी दिलेली आहे पण महाविकास आघाडीचे उमेदवार आणि मराठी उमेदवार म्हणून ओळखले जाणारे संजय दिना पाटील यांना मात्र पॅम्प्लेट्स लावू दिले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद ईशान्य मुंबईत रंगताना दिसतोय.