राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, कौशल्य विकास विद्यापीठाला रतन टाटांचं नावं दिलं जाणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. विद्यापीठाला रतन टाटा स्कील सेंटर असं नाव देण्यात येणार आहे.
यापार्श्वभूमीवर मंगलप्रभात लोढा म्हणाले की, देशात सर्वप्रथम कौशल्य विकास विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये विस्तापित झाला होता. याच्या महाराष्ट्रात पाच ब्रांच आहेत. आता झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत या विद्यापीठाचे नाव भारतभूषण रतन टाटा विद्यापीठ असं दिलेलं आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आभार मानतो. रतन टाटा यांच नाव देशातील सर्व क्षेत्रातमध्ये उच्च नाव होत आणि देशाच्या पहिल्या विद्यापीठाला त्यांच नाव देण्यात येत आहे याच सौभाग्य आपल्याला लाभल आहे.