महिला स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल राज्य ठरलेलं आहे. वर्षभरात राज्यात स्टार्टअपची संख्या ही 10,381 इतकी ठरलेली आहे. राज्य सरकारच्या धोरणांमुळे स्टार्टअपमध्ये वाढ झालेली आहे असं समोर येत आहे. महाराष्ट्र 10,381 स्टार्टअपसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर दिल्ली 6,068 स्टार्टअपसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तसेच कर्नाटकमध्ये 5,870 आणि उत्तर प्रदेशमध्ये 5,535 तर गुजरातमध्ये 4,023 इतके वर्षभरात स्टार्टअप सुरु करण्यात आले आहेत.