बदलापूरमधील एका प्रसिद्ध शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. सफाई कामगाराने अत्याचार केल्याची संतपाजनक घटना समोर आली आहे. तर लैंगिक अत्याचाराच्या 4 दिवसानंतर प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळत आहे. कोलकाताचे महिला डॉक्टर प्रकरण ताजे आणि चालू असताना आता महाराष्ट्रात या दोन लहान मुलींवर सफाई कामगाराने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पालकांसह नागरिकांचही शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरु असून, पालक तसेच नागरिक आक्रमक झालेले पाहून शाळेच्या गेटवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे बदलापूरमध्ये पालक आणि नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
यापार्श्वभूमीवर दिपक केसरकर आक्रमक भूमिका स्पष्ट करत म्हणाले, विशाखा समिती जी ऑफिसमध्ये असते तशी विशाखा समिती आता शाळांमध्ये निर्माण करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या ज्या मुली असतील साधारण 10वी मधल्या 9वी मधल्या किंवी ज्युनियर कॉलेजमधल्या 11वी आणि 12वी मधल्या यांची एक विशाखा समिती असेल. कारण, मुलं ही आपल्या शिक्षकांनासुद्धा सांगायला घाबरतात म्हणून आम्ही हा निर्णय घेतला कारण, हे खूप गंभीर प्रकरण आहे. अशी परिस्थिती दुसऱ्या कोणत्याही मुली वर येता कामा नये. मी मुख्यमंत्र्यांसोबत 5 ते 10 मिनिटं चर्चा केली कारण अनेक ठिकाणी हे अशे प्रकार घडतं आहेत आणि लहान मुलांच्या बाबतीत याच्यावर कारवाई झाली पाहिजे.
माझ्याकडे आलेल्या अहवालानुसार हा प्रकार 13 ते 16 ऑगस्टच्या दरम्यान घडला आहे. 18 तारखेला याची तक्रार पालकांनी केली म्हणजे जवळ जवळ 12 तासांनी त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती. शाळेला आम्ही नोटीस पाठवलेली आहे कारण ही शाळेची जबाबदारी असते शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले तिथल्या शिक्षक दिपाली देशपांडे आणि असिस्टंट कामिनी गायकर आणि निर्मला भोरे यांना ताबडतोब निलंबन करण्यात आलेलं आहे. प्रत्येक शाळेत कॅमेरा कंपल्सरी केलेले आहेत. तसेच जो गुन्हेगार आहे त्याच्यावर पोक्सोच्या अंतर्गत कलम 74, 75, 76 याच्यावर आधारे गुन्हे दाखल केलेला आहे. या गुन्हेगारला कठोर शिक्षा व्हावी म्हणून मी उपमुख्यमंत्रींसोबत बोलणार आहे आणि या गुन्हेगारला लवकरात लवकर शिक्षा कशी देता येईल याकडे लक्ष देऊ