दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे, दुरुस्ती मंडळाने प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार केलेला आहे आणि आता त्यानुसार या परिसरात पुनर्विकास केले जाणार आहे. प्रकल्पाला उच्चस्तरीय समितीकडून सुद्धा हिरवा कंदील दाखवलेला आहे त्यामुळे इथला पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे. आठवड्याभरात पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी निविदा काढली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे लवकरचं येथे बांधकामाला देखील सुरुवात होण्याची शक्यता आहे.