निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज नवी मुंबईत असणार आहेत. बेलापूर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रचाराकरता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची जाहीर सभा नवी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
अमित शाह यांचा दौरा रद्द झाला असून त्याऐवजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची जाहीर सभा नवी मुंबईत होणार आहे.