ज्या पद्धतीने माझ्या पत्नीवर, मुलावर गुन्हा दाखल झाला ही दुर्दैवाची बाब आहे. काल आम्हाला मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला. आमचा न्यायदेवतेवर विश्वास होता, आहे आणि राहील. आम्ही निर्दोष आहोत हे आम्हाला आणि जनतेलाही माहीत आहे. जनतेच्या आशीर्वादामुळेच आम्ही पुढे जात आहोत. एसीबीने चुकीच्या पद्धतीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. एसीबीवर काय अॅक्शन घेता येईल यासाठी आम्ही कायदेतज्ज्ञाची मदत घेणार आहोत असं आमदार राजन साळवी म्हणाले.