रक्षाबंधनाचा सण जसजसा जवळ येत आहे... तशी राखीची मागणीही वाढत आहे... कुणी आपल्या लाडक्या भावासाठी कुरिअरने राखी पाठवत आहे... तर कोणी सर्वात सुंदर राखीच्या शोधात आहे... गुजरातमधील सुरत येथील एका दुकानातील राखी लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनली आहे... याला कारण आहे राखीची किंमत आहे...
सुरतच्या दुकानात देशातील सर्वात महागडी राखी तयार झाली आहे. राखीची किंमत तब्बल 5 लाख रूपये आहे. या दुकानात धाग्यापासून बनवलेल्या राख्या ते सोने, चांदी, प्लॅटिनम ते डायमंडने जडलेल्या राख्या आहेत. राख्यांच्या सौंदर्याचे आणि डिझाइनचे कौतूक होत आहे. 5 लाखांच्या राखीने मात्र, सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
काय आहे राखीचे वैशिष्ट
सोन्याचा वापर करुन राखी तयार केली आहे
राखीत हिऱ्यांचाही वापर करण्यात आला आहे
इकोफ्रेंडली आयडियाचा वापर केला आहे
बहिण-भावच्या प्रेमाचं नातं म्हणजे रक्षाबंधन...या बंधनाला रेशमच्या धाग्याचे मोल अनमोल असते. परंतु काळ बदलला तसं रक्षाबंधन साजरा करण्याची पद्धत बदलली. आकर्षक व महाग राख्या बाजारात आल्या...महागड्या भेटवस्तू दिल्या जाऊ लागल्या... परंतु बहिण-भावाच्या प्रेमाचे हे नाते मात्र वर्षांनवर्ष तसेच आहे आणि राहणारही आहे...
वेंगुर्ला बस स्थानकात सेवा बजावणारे सी. बी. जाधव काही दिवसांपूर्वी निवृत्त झाले, ज्या दिवशी ते निवृत्त झाले त्या दिवशी भावूक होत ज्या बसने कित्येक वर्ष आपल्याला सांभाळाले, जिच्या जीवावर आपला उदरनिर्वाह चालू होता, आपलं घर चाललं त्या निर्जिव बसविषयी कृतज्ञता व्यक्त करताना वाहक सी. बी. जाधव भावूक होऊन तिच्यासमोर नतमस्तक होत हात जोडून बसविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करत आहेत. कंडक्टर सी. बी. जाधव यांचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला सोशल झाला आहे. हिंदी माध्यमांनी या फोटोची दखल घेतली गेली आहे.