मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये प्रचंड आक्रमक झालेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून त्यांना माझा बळी हवा आहे असा आरोप जरांगेंनी केला आहे. जरांगे यांची आक्रमक भूमिका पाहता गावकऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सध्या आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळाचा वातावरण पाहायला मिळाले.
हे सगळं देवेंद्र फडणवीस करत आहेत. मुख्यमंत्री शिंदेंची काही लोकं सुद्धा आहेत. मी सागर बंगल्यावर पायी येतो, मला मारुन दाखवा. माझा एन्काऊंटर करण्याचाही फडणवीसांचा विचार होता, सलाईनमधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव होता, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.