सदावर्ते म्हणाले, एसटी कष्ट जनसंघ जो आमचा आहे त्याचे सर्वअधिक 65 हजार कष्टकरी सभासद आहेत. अजीव सभासद आहेत आणि सन्मानीय पडळकर साहेबांची एक संघटना आहे. त्याचबरोबर सन्मानीय आमदार पावस्कर साहेबांचा संघटना आहे. आमच्या ज्या संघटना आहेत या मेजॉरिटी कष्टकऱ्यांचे नेतृत्त्व करतात. आमच्याकडून तर संपाची नोटीस दिलेली नाही. जो राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचे जे कृती समिती आहे त्याला आम्ही त्याला किडेकृती समिती म्हणतो.
त्या किडेकृती समिती आहे त्यांनी ज्यावेळेस 124 कष्टकऱ्यांनी आत्महत्या केल्या तेव्हा किडेकृती समितीने कधी त्यांच्या बद्दल चिंता व्यक्त केली नाही. सातवा वेतन आयोग ही मागणी जनसंघाची आहे. ती आमची मागणी आहे आणि आम्ही त्याचा पाठपूरावा देखील घेत राहणार. ती संविधानिक हक्काची गोष्ट आहे तसेच ती न्यायालयाच्या निरिक्षणाची गोष्ट आहे. एसटीचं संप हे महाविकास आघाडीचं कुबांड आहे. सुप्रिया ताई काल म्हणाल्या एसटी आम्ही गावा गावात पोहचवू पण त्यांना महाराष्ट्रातलचं काही माहित नाही. आम्ही जेव्हा भूमिका घेऊ तेव्हा ती भूमिका खरी घेऊ.
सातवा वेतन यांची मागणी नाही तर यांची मागणी करार आहे आणि त्यासाठी हा सगळा मुखवटा चालू आहे. हे संप जर खरचं असेल तर तशी नोटीस या लोकांनी पाठवावी यांनी संपाची नोटीस पाठवली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांच्यासोबत कोणी नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये जर हिंमत असेल तर यांनी येऊन सांगाव की, आम्ही हा संप केला आहे. यांनी हे सगळ निवडणुकीच्या तोंडवार केलेलं राजकीय कुबांड आहे. संपाच्या नावावर हे एक रचलेलं कटकारस्थान होतं ते कटकारस्थान हे कष्टकरी चालू देणार नाहीत.