कांदा उत्पादकांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्राकडून कांदा निर्यातीला परवानगी मिळाली आहे. 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी मिळाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या वतीने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
कांदा उत्पादकांचे जे कांदा उत्पादनांसंदर्भात वारंवार मत- मतांतर समोर येत होते, मागण्या पूर्ण होत नव्हत्या; तर आता या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्राकडून कांदा निर्यातीला परवानगी मिळाली आहे. विरोधक आक्रमक झाल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.
खरं तर या संदर्भात ज्या प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, आंदोलनं सुरू होती, विरोधक आक्रमक झाले होते, टीका केल्या जात होत्या, आरोप प्रत्यारोप सुरू होते, या सर्वांमुळे राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. यातचं विरोधक आक्रमक झाल्यामुळे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.