नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोवा राज्यात बनवल्या जाणाऱ्या विदेशी दारूचा साठा जप्त केलेला आहे. गोवा ते कोल्हापूर, कोल्हापूर ते नाशिक, नाशिक ते गुजरात असं चालणारं मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. चालक बदलून होणाऱ्या दारू तस्करीच्या नव्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून आरोपी पदमसिंग बजाडला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने तब्बल 61 लाखांचा ट्रकसह मुद्देमाल जप्त केला आहे. विदेशी दारूच्या तस्करीचे रॅकेट लवकरच उघडकीस आणलं जाईल. नाशिक ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी माहिती दिली आहे.