मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हंटले आहे. मागासवर्ग आयोगाचं युद्धपातळीवर काम सुरु आहे. दीड लाख अधिकारी 3 शिफ्टमध्ये नोंदी शोधण्याचं काम करतंय, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.