राम मंदिरांवरून खडसे-महाजनांमध्ये जुंपलेली पाहायला मिळतेय. 'कार सेवेत योगदान नसलेले पुढे येऊन बोलत आहेत' असं त्यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका केली आहे. खडसेंची मानसिक स्थिती बिघडली आहे अशी महाजन यांनी टीका केली आहे. खडसेंच्या डोक्याचा इलाज करावा लागेल महाजन यांनी एकनाथ खडसेंवर ही टीका केलेली आहे. राम मंदिर कार सेवेवरून एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्या आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. कार सेवेदरम्यान गिरीश महाजन होते का असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. ज्यांचं योगदान नाही ते पुढे येऊन बोलत आहेत अशी टीका खडसेंनी गिरीश महाजनांवर केली होती. तर खडसेंच्या टीकेला उत्तर देताना गिरीश महाजनांनी खडसेची मानसिक स्थिती खराब असल्याचं म्हटलं आहे.