सलीम कुत्ता प्रकरणावरून सुरू झालेल्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. 'एकनाथ खडसेंनी केलेल्या आरोपावरून विधानसभेत हक्कभंग आणणार' असे गिरीश महाजन म्हणाले. 'कुणीही आमंत्रण दिलं तर लगेच जायचं असं होतं का? दाऊदने आमंत्रण दिलं तर दुबई किंवा पाकिस्तानला जाणार का?' असा प्रश्न देखील एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले. 'गिरीश महाजन यांना हक्कभंग दाखल करायचा असेल तर त्यांनी खुशाल करावा' असे आवाहन एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना दिले आहे.