सलीम कुत्ताबाबत समोर आलेल्या व्हिडिओ फोटो वरून एकनाथ खडसे व गिरीश महाजन हे पुन्हा आमने-सामने आले आहेत. दाऊदच्या संभाषणाच्या आरोपावरून माझा मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला होता. आता दाऊद कुत्तासोबतचे जे फोटो समोर आलेत. त्यात गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोहाचे आरोप होत आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावर गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसे यांचा राजीनामा दाऊदच्या आरोपांमुळे नव्हे तर पक्षात राहून चोऱ्या केल्यामुळे खडसेंना पक्षाने हाकलून दिला आहे, गिरीश महाजन म्हणाले.