नवी दिल्ली : तैवानमध्ये गेल्या २४ तासांत तीन मोठे भूकंप झाले आहेत. ठिकाणी ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे समजत आहे. यामुळे मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. रस्ते, पुलला तडे गेले आहेत. सोबतच जीवितहानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या पार्श्वभूमीवर जपानने तैवानला त्सुनामीचा इशाराही जारी केला आहे.
शनिवारपासून तैवानमधील अनेक भागात भूकंपाचे हादरे बसत आहेत. रविवारी 7.2 रिश्टर स्केलचे झटके बसले. यापूर्वी शनिवारी आलेल्या भऊकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू तैतुंग परिसरात होता.