काँग्रेस अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. आज पाटणा येथे विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव टाकरे यांनी राहुल गांधींना अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार काँग्रेस राज्यसभेमध्ये दिल्लाच्या अध्यादेशावर केजरीवाल यांना पाठिंबा देऊ शकते, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी केजरीवाल सतत हा मुद्दा उपस्थित करत होते आणि संसदेत अध्यादेशाच्या मुद्द्यावर सर्व पक्षांनी त्यांच्या पाठिशी उभे राहावे अशी मागणी करत होते.