रायपूर : छत्तीसगडचा मुख्यमंत्री निवडताना भाजपनं धक्कातंत्र अवलंबले आहे. भाजपनं विष्णूदेव साय या आदिवासी नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली आहे. रमणसिंह हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. पण यावेळी रमणसिंह यांच्याऐवजी आदिवासी असलेल्या विष्णूदेव साय यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालण्यात आली. विष्णूदेव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. छत्तीसगडच्या रायगडातून ते चारवेळा खासदार म्हणून निवडून आलेत. 2019ला त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती पण यावेळी ते निवडून तर आलेच शिवाय आता त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.