मंत्री छगन भुजबळांचा खळबळजनक दावा केला आहे. आंतरवाली सराटीमधील दगडफेकीमध्ये रोहित पवार आणि राजेश टोपेंचा हात असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. तर लाठी चार्जनंतर जरांगे तिथून निघून गेले होते पण रोहित पवार आणि राजेश टोपेंनी त्यांना पुन्हा आणून बसवलं असा आरोप ही छगन भुजबळ यांनी केला आहे. तसेच पवार आणि ठाकरेंना याबद्दल काहीच माहित नव्हतं असं ही भुजबळांनी म्हणालं आहे.
यापार्श्वभूमीवर छगन भुजबळ म्हणाले की, माझ्या माहिती प्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता. रात्री 2 वाजता राष्ट्रवादीचे 2 आमदार एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार ही दोन नावं समोर आली. या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवार साहेबांना तिथे नेलं. पवार साहेब गेले आणि उद्धव ठाकरे गेले ते दोघे तिथे गेले पण त्यांनासुद्धा कल्पना नव्हती. तर तिथे दगडफेक झाली आणि त्याचाच फायदा जरांगेला मिळाला आणि तिथल्या लोकांनमध्ये हे पसरवलं की या दोघांनी दगडफेक केली.