‘बॉम्बे हायकोर्ट’चे नामकरण ‘मुंबई हायकोर्ट’ करण्याचा मुद्दा संसदेत चर्चेत आला. संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडून उत्तर देण्यात आले. त्यांनी म्हटले की ‘बॉम्बे हायकोर्ट‘चे नामकरण ‘मुंबई हायकोर्ट’ करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकार, गोवा सरकार आणि ‘बॉम्बे हायकोर्ट’कडून मंजुरी मिळाली आहे. परंतु मद्रास हायकोर्टचे नाव बदलून ‘तमिळनाडू हायकोर्ट’ आणि कलकत्ता हायकोर्टचे नाव बदलण्यास त्या राज्यातील सरकार आणि हायकोर्टकडून मंजुरी मिळाली नाही.