2 सप्टेंबरपासून भाजपची सदस्यत्व नोंदणी मोहीम आता सुरु होते. 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या मोहिमेचा पहिला टप्पा आहे. सर्व विद्यमान सदस्यांना पुन्हा सदस्यत्व नोंदणी घ्यावी लागणार आहे. 2 सप्टेंबरला पंतप्रधानांना पक्षांध्यक्षाकडून सदस्यत्व दिलं जाईल.
सदस्यत्व मोहिमेमुळे केवळ पक्षाचा पायाच पुनरुज्जीवित होणार नाही तर निवडणुकीपूर्वी संघटनात्मक उभारणीही होईल, अशी अपेक्षा पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, देशव्यापी सदस्यत्व मोहिमेत 10 कोटींहून अधिक सदस्यांची नोंदणी करण्याचे लक्ष्य आहे.