एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धामणगाव विधानसभेचे भाजपचे उमेदवार आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. ाजपा महायुतीचे उमेदवार आमदार प्रतापदादा अडसड यांच्या भगिनी अर्चनाताई रोटे (अडसड) यांच्यावर सातेफळ जवळ चाकू हल्ला करण्यात आलाय. प्रताप अडसड यांच्या सर्व प्रचाराची धुरा त्यांच्या बहिणीकडे आहे. सकाळ पासून सायंकाळ पर्यंत त्या गावा गावात जाऊन प्रचार करत आहेत. मात्र, आज रात्री सातेफळ फाट्याजवळ 7 ते 8 जण अज्ञातांनी त्यांच्यावर चालूने हल्ला केलाय.