विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महाड मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. महाड, पोलादपूर व माणगाव या तीन तालुक्यातील माजी सैनिक संघटनेने भरत गोगावले यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याने गोगावले यांचे पारडे आणखी जड झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाड येथील कोटेश्वरी तळे सभागृहात माजी सैनिकांनी मेळावा घेऊन पाठींबा देत असल्याची घोषणा केली यावेळी माजी सैनिकांचे कुटुंबिय देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते गोगावले यांनी माजी सैनिकांना नेहमीच आधार दिला असल्याने निवडणुकीत त्यांच्या सोबत राहणार असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
भरत गोगावलेंसाठी माजी सैनिक एकवटले आहेत. महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचा गोगावले यांना पाठिंबा असल्याच समोर येत आहेत. मेळावा घेत गोगावलेंच्या प्रचारासाठी माजी सैनिकांची कुटुंबासह मोठी उपस्थिती पाहायला मिळाली आहे.
ज्यावेळेस आमदार गोगावले जे आजा आमदारकीच्या पदावर आहेत ते 1999 मध्ये ज्यावेळेस कारगिल युद्ध सुरु होत. त्यावेळेस जे जवान शहिद झाले होते त्यांचे मृतदेह घरोघरी जात होते अशावेळी भयभीत वातावरण निर्माण झालं होत. अशावेळी गोगावले हे राजकारणात नसून सुद्धा त्यांनी लोकांच सांत्वन केलं होत. असं तेथील सैनिकांच म्हणं आहे.