बुलढाण्यात एका धार्मिक कार्यक्रमातून 450 ते 500 भाविकांना विषबाधा झाली असताना डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. लोणार तालुक्यातील सोमठाणा गावातील हा प्रकार आहे. नागरिकांना उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्याने 20 ते 22 जणांची प्रकृती गंभीर झाली आहे. रुग्णांना सलाईन देण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसताना डॉक्टरांनी दोरीवर सलाईन लावत रुग्णांवर उपचार केले आहेत. तसेच रुग्णालयात जागा उपलब्ध नसताना वेळप्रसंगी जिथे जागा मिळेल तिथे उपचार करत रुग्णांना धोक्यातून बाहेर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. डॉक्टरांच्या या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 450 ते 500 जणांपैकी 100 ते 200 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे. तर इतर जणांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील काही वृद्ध नागरिकांची प्रकृती गंभीर आहे.