राज्यभरातील अंगणवाडी सेविका आजपासून बेमुदत संपावर आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा तसेच वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी आजपासून संपावर आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अंगणवाडी सेविकांनी काम बंद आंदोलन असणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या काम बंदमुळे गरोदर महिला आणि बालकांचे मात्र हाल होणार आहे. दरम्यान मागणी मान्य झाल्यास हिवाळी अधिवेशन काळात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा अंगणवाडी सेविकांनी सरकारला दिला आहे. राज्यातील जवळपास दोन लाख अंगणवाडी केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. अंगणवाडी कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत.