विधानसभा विजयासाठी अमित शाहांनी 10 सुत्री कार्यक्रम ठेवल्याची माहिती आहे. हा कार्यक्रम आपले जे नेते आहेत त्यांच्यासोबत शेअर केल्याची माहिती ही समोर येत आहे. प्रत्येक बुथवर 10 टक्के मतं वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आजी- माजी सरपंचांना पक्षासोबत घेण्याचे निर्देश ही दिल्याची माहिती आहे तसेच जे नाराज झालेले नेते आहेत त्यांची देखील समजूत काढली जाणार आहे.
नागपुर दौऱ्यामध्ये अमित शाहांनी राज्यातील नेत्यांना या सूचना दिल्या आहेत अशी माहिती समोर आली आहे. अमित शाहांनी विधानसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केल्याच पाहायला मिळत आहे. लोकसभेला भाजपला मोठा फटका बसलेला पाहायला मिळालेला होता आणि त्याचपार्श्वभूमीवर आता जास्त खबरदारी घेतली जात आहे.
भाजपकडून स्वतः अमित शाहा मुंबईमध्ये दोन दिवस आहेत. तर या दिवसांमध्ये 10 सुत्री कार्यक्रम शिस्तबंध पद्धतीनुसार पार पाडण्यात येणार आहे. तर अमित शाहांकडून ठेवण्यात आलेला हा 10 सुत्री कार्यक्रम कशाप्रकारे पार पडणार आहे याकडे लक्ष लागलेलं आहे.