राज्यसभेचे सर्व 6 उमेदवार करोडपती असल्याची माहिती समोर आली आहे. प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांच्याकडे 483 कोटींची संपत्ती आहे. तर चंद्रकांत हंडोरेंची संपत्ती सर्वांत कमी असल्याची माहिती आहे.
उमेदवारी अर्ज भरताना संपत्ती जाहीर करावी लागते. या जाहीर केलेल्या संपत्तीनुसार प्रफुल्ल पटेल हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता तब्बल ४८३ कोटीवर आहे. अशोक चव्हाण यांची जंगम मालमत्ता २६ कोटी असून, स्थावर मालमत्ता ५१ कोटी ६५ लाख इतकी आहे, गेल्या पाच वर्षात चव्हाण याच्या मालमत्तेत १८ कोटीची भर पडली आहे. मेधा कुलकर्णी यांच्याकडे २ कोटी ४८ लाखांची स्थावर संपत्ती असून, त्यांची जंगम मालमत्ता २ कोटी ४३ लाख रुपयांची आहे.
डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे १ कोटी ८८ लाख मूल्याची स्थावर मालमत्ता असून, ३ कोटी ४१ लाख रुपयांची जंगम संपत्ती आहे. मिलिंद देवरा यांच्याकडे २३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून, ते व त्याच्या पत्नीकडे ११४ कोटीची जंगम मालमत्ता आहे. चंद्रकांत हंडोरे यांची स्थावर मालमत्ता १ कोटी ६८ लाख रुपयांची असून, जंगम मालमत्ता ८६ लाख ७२ हजार रुपयांची आहे.