पुण्यात दोन दादांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. 'निधी न मिळाल्यास कोर्टात जाण्याची तयारी ठेवा' असे चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत सूचना दिल्याचे लोकशाही मराठीला सूत्रांनी सांगितलं आहे. लोकशाही मराठीला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे, अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीतील भाजपच्या सदस्यांना कमी निधी दिल्याचा आरोप केला गेला आहे. चंद्रकात पाटलांच्या भूमिकेमुळे आजी माजी पालकमंत्र्यांमद्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.