विधानसभेची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे दोन प्रमुख पक्षांमध्ये फुट पडल्यानंतरची ही पहिली निवडणूक ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी "लोकशाही मराठी"ला विशेष मुलाखत दिली.
या मुलाखतीत अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, "मी पक्ष सोडलेला नाही. आम्ही पक्षातच आहोत. चिन्हही आमच्याकडे आहे आणि पक्षही आमच्याकडे आहे." तसेच, महायुतीला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल ते म्हणाले, "दिवसेंदिवस महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही १७५ पेक्षा जास्त जागा जिंकून आमचं सरकार स्थापन करू." अजित पवार यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देखील या मुलाखतीत दिली.