कुडाळ : राज्यात बसलेले घटनाबाह्य खोके सरकार ३१ तारखेला पडणारच, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. विधानसभा-लोकसभा ताब्यात घ्यायचीय, मिशन म्हणून काम करा, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. घटनाबाह्य पध्दतीने राज्यात बसलेले खोके सरकार येत्या ३१ तारखेला पडणार, असा दावा त्यांनी केला आहे.