व्हिडिओ

Yes Bank 400 कोटींचं फसवणूक प्रकरणी ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आरोपीला अटक

येस बँकेचं 400 कोटींचं फसवणूकीच्या प्रकरणात ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आरोपीला अटक पोलिसांनी अटक केली आहे.

Published by : Dhanshree Shintre

येस बँकेचं 400 कोटींचं फसवणूकीच्या प्रकरणात ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आरोपीला अटक पोलिसांनी अटक केली आहे. येस बँकेचे कर्ज बुडवून 400 कोटींच्या फसवणुकीतील आरोपी अजीत मेनन याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. गेल्या तीन वर्षांपासून आर्थिक गन्हे शाखा मेननचा शोध घेत होती. पण तो ब्रिटनमध्ये राहत असल्यामुळे त्याला अद्याप अटक झाली नव्हती.

आरोपी कॉक्स ॲण्ड कंपनीचे प्रवर्तक पीटर केरकर यांचा सहकारी आहे. मेननला दिसताक्षणी अटक करण्याच्या सूचना देशातील सर्व विमानतळांना देण्यात आल्या होत्या. त्याच्या आधारावर मेनन केरळ येथे आला असता त्याला पकडण्यात आले. येस बँकेची फेब्रुवारी 2021 मध्ये सुमारे 400 कोटींची फसवणूक केल्याबद्दल कॉक्स अँड किंग्ज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कॉक्स आणि किंग्सची कंपनीच्या उपकंपनीविरोधात गुन्हा नोंदवला होता. केरकर यांच्या सूचनेनुसार मेनन हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी