मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल...घामाघूम होत तास-दोन तासांचा प्रवास करणारे मुंबईकर...परंतु हे चित्र बदलू लागले आहे...मुंबईकरांचा प्रवास गारगार हवेत होऊ लागला आहे...या गारगार लोकलला मुंबईकर मोठा प्रतिसाद देत आहे
एसी लोकलच्या तिकीट दरात झालेली कपात आणि गर्दीतील प्रवास टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागला आहे. गेल्या सहा महिन्यांत एसी लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची संख्या सहा पट वाढली आहे. फेब्रवारी 2022 मध्ये रोज सहा हजार प्रवाशी प्रवास करत होते ती संख्या जुलै महिन्यांत 35 हजार झाली आहे.
मध्य रेल्वेने मागील मे महिन्यात एस लोकलच्या तिकीट दरात कपात केली. त्यानंतर एसी लोकलमधून प्रवास करणारे प्रवाशी वाढले. 14 मेपासून सीएसएमटी ते कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ मार्गांवर 12 वातानुकूलित सेवा वाढवण्यात आल्या. यामुळे एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या 44 वरून 56 वर पोहोचली.
एसी लोकलमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होऊ लागला आहे. आरामदायी प्रवासाचा लाभ घेण्यात डोंबिवलीकर आघाडीवर आहेत. कमी वेळेत, कमी खर्चात जलद व आरामदायी प्रवासामुळे मुंबईकरांची पसंती एसी लोकला मिळू लागली आहे.