भिवंडीत स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून बिल्डरने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये बिल्डर महावीर पटवाने नागरिकांची तब्बल 175 कोटींची फसवणूक केली आहे. स्वस्तात घराच्या जाहिरातींला भुलून सुमारे 4 हजारांहून अधिक नागरिकांनी या प्रकल्पात पैसे गुंतवले होते मात्र बिल्डरने हा प्रकल्प अर्धवट सोडून गुंतवणूकदारांचे सुमारे 175 कोटी रुपये हडप केले आहे. याबाबत बिल्डरविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती. यानंतर गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे व राज्य शासनाकडे देखील तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने 10 नोव्हेंबर 2023 रोजी महावीर पटवा बांधकाम व्यवसायिकाची मालमत्ता सील करण्याचे आदेश दिले आहेत.