रशियाने युक्रेनवर हल्ला (russia-ukraine war) केल्यानंतर काही अपवाद वगळता सर्व देशांनी त्या निषेध केला आहे. तसेच सर्व बाजूंनी रशियाला एकाकी पाडण्यासाठी सर्व जग एकत्र आले आहे. रशियातील वितरण साखळी, बँकिग सेवा, क्रीडा क्षेत्र यांसह अनेक क्षेत्रांत रशियाबरोबर असलेले संबंध संपुष्टात आणले जात आहेत. दरम्यान आज (2 मार्च) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी अमेरिकन संसदेत केलेल्या भाषणात आपण युक्रेनच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे जाहीर केले. अमेरिका आणि आमचे सहयोगी देश नाटो क्षेत्राच्या प्रत्येक इंचाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. पुतीन यांना युद्धभूमीवर फायदा होऊ शकतो. परंतु त्यांना याची दीर्घकाळासाठी मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. तसेच आर्थिक निर्बंध लादून रशियाची कोंडी करणार असं देखील म्हटलं आहे.
अमेरिकेवर विश्वास ठेवण्यासाठी बायडेन यांनी युक्रेनियन नागरिकांचे आभार मानले. त्यांनी दाखवलेल्या शौर्याची प्रशंसा केली. बायडेन यांनी तत्काळ रशियातून येणाऱ्या सर्व विमानसेवांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घोषणेनंतर त्यांना स्टेट ऑफ द युनियनच्या (State of the Union) सभेत सर्वांनी स्टॅडिंग ओव्हेशन दिलं. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं. कोणत्याही परिस्थितीत आम्ही युक्रेनच्या पाठिशी आहोत, असं आश्वासन देत त्यांनी पुतीन यांना हुकुमशाहा असल्याचं संबोधलं.
काय म्हणाले बायडेन?
युक्रेनच्या नागरिकांचे मानले आभार
पुतीन हे डिक्टेटर..त्यांनी माणसांचा नरसंहार केला
रशियाचा युरोपला तोडण्याचा डाव
रशियानं एवढा कडवा प्रतिकार अपेक्षित केलाच नसेल
युक्रेनच्या नागरिकांनी रशियाला दाखवलेलं धाडस कौतुकापद आहे
पुतीन यांना जगाने एकट पाडलंय..याआधी कधीही असं झालं नव्हतं.
आम्ही मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले आहेत
आम्ही रशियाच्या बँका आणि त्यांच्यावरील टेक्नॉलॉजिकल निर्बंध लादत आहोत
प्रायव्हेज जेट्स, लक्शरी अपार्टमेंट्स
नाटो देशांच्या संरक्षणासाठी अमेरिका सैन्य पाठवेल
१ बिलियन अमेरिकन डॉलर्स युक्रेनला मदत